Bopdev Ghat Gang Rape | पुण्यात बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली, जिथे तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणी राजेखां करीम पठाणसह तिघांना अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली असून, नागरिकांनी पोलिस ठाण्याबाहेर जमून विरोध दर्शवला. सध्या या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Ajit Pawar । धक्कादायक बातमी! अजित पवार गटाच्या तालुकध्यक्षांचा अज्ञातांच्या हल्ल्यात मृत्यू
या प्रकरणी एक सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे.या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित आरोपी तीनजण दिसत असून पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक डाटाच्या मदतीने तपास सुरू केला आहे. (Bopdev Ghat Gang Rape ) त्याचबरोबर घटना घडली त्या ठिकाणी दहा किमी अंतराच्या परिसरात सीसीटीव्ही देखील नसल्याने तपास करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यामध्येच आता बोपदेव घाटात सासवडच्या बाजूला तीन संशयितांचं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे.
सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत. नागरिकांकडून देखील यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. या घटनेमुळे पुणे शहर हादरून गेले असून मुलींच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
Ladki Bahin Yojana l आनंदाची बातमी! ‘लाडकी बहीण’चा चौथा आणि पाचवा हप्ता एकदम जमा होणार