भारत आणि पाकिस्तान हा वाद काही नविन नाही. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भारतात आणि पाकिस्तानमध्ये सतत वाद चालू असतात. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान सतत एकमेकांविरोधात बोलत असतात. सध्या पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रीदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मोठी बातमी! सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तूम्ही पाहू शकता की, पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रीदी हा भारतीय ध्वजावर सही करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर नविन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
दोघींच्याही घायाळ अदा मात्र, सबसे कातील कोण गौतमी पाटील की संध्या पाटील? पाहा VIDEO
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओमध्ये शाहिद आफ्रिदी हा मोठ्या मनाचा असल्याचा सांगण्यात आलं आहे. मात्र भारतीय ध्वजावर सही करणे योग्य आहे का? असा देखील सवाल अनेक नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
विराट कोहली आणि अनुष्काकडे आहेत ‘या’ कोट्यवधी गोष्टी; वाचून तुम्हीही व्हाल थक्क