
मुंबई : पावसाळी अधिवेशनात धक्काबुक्कीच कारण ठरलेलं विधान 50 खोके. हेच विधान सध्या राजकीय वर्तुळात चर्चेची बाब बनलय. अशातच आता यावर आता शिवसेनेने मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून यावर स्पश्ट मत व्यक्त केलं आहे.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसलेल्या खोकेवाल्यांचा उद्धार
सामनात अस म्हणण्यात आल आहे की, “मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी ‘महाराष्ट्रातील खोक्यांचा फॉर्म्युला वापरून ‘आप’चे आमदार विकत घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे.’ आता याचा अर्थ असा होतो की, महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसलेल्या खोकेवाल्यांचा उद्धार झालाच.तसेच उरल-सुरल बिहारमध्ये देखील राजद-जदयुचे नेते , ‘महाराष्ट्र में जो खोकेवाली राजनीती हुई, वो बिहार (Bihar Politics) में फेल हो गयी!’ अस जाहीरपणे बोलत आहेत.
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा ऐतिहासिक पराक्रम, डायमंड लीगचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला
महाराष्ट्रात ‘खोके हराम’ नावाची संघटना उदयास
महाराष्ट्राला हा कलंकच लागला म्हणायचा.कारण गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले पडले आहे.पायरीवरच्या खोकेवाल्यांनी हे नीट समजून घ्यावे. जगाच्या पाठीवर ‘बोको हराम’ नावाची एक बदनाम संघटना आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रा देखील ‘खोके हराम’ नावाची संघटना उदयास आलीये. त्यात बोकेही आहेत आणि खोकेही आहेत. हरामखोरी हाच त्यांचा धर्म आहे. ‘खोके हरामांचे अस्तित्व जास्त काळ टिकणार नाही, हे मात्र नक्की!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
खोका, मोका आणि धोका!
यंदा राज्यामध्ये जोरदार पाऊस झाला आहे, पण विरोधकांनी मागणी करूनही सरकार ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. पण जनहिताच्या बाबतीत त्यांच्या अकलेचाच दुष्काळ पडला आहे.याचा परिणाम दोन दिवस सभागृहातून विधानसभेच्या पायऱयांवर आला. पण खोकेछाप शिंदे गटाचा खरा चेहरा उघड झाला. पूर्वी तालेवार लोकांना रावसाहेब, रावबहादूर वगैरे उपाध्या लावल्या जात आहे.
पण शिंदे गटाच्या लोकांपुढे म्हणजे त्यांनी चोरलेले जे आमदार वगैरे मंडळी आहेत, त्यांच्या आडनावापुढे यापुढे वंशपरंपरेने ‘खोकेवाले’ ही उपाधी लागेल. अगदी सहज सोप्या भाषेत हा विषय समजवायचा तर ‘दिवार’ चित्रपटात अमिताभ बच्चन याच्या हातावर कोरले होते, ‘मेरा बाप चोर है!’ त्याच पद्धतीने या चोरांच्या पुढच्या पिढीच्या कपाळावर कोरले जाईल, ‘मेरा बाप, भाई, आजोबा खोकेवाला था ! आणि त्याने महाराष्ट्राशी, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली!’ हा शिक्का पुसता येणे कठीणच आहे.
Anil Deshmukh: जेलमध्ये अनिल देशमुखांची प्रकृती बिघडली, जे.जे.रुग्णालयात केलं दाखल
जिथे पैसा तिथे बच्चू कडू
अमरावतीमधील रवी राणा विरुद्ध बच्चू कडू यांच्यातील चोर कोण व खोकेवाले कोण याचा पर्दाफाश झाला.कारण रवी राणा म्हणाले, ‘जिथे पैसा तिथे बच्चू कडू. बच्चूसाठी बाप बडा न भय्या, सबसे बडा रुपय्या!’ रवी राणा म्हणतात, ‘मी गुवाहाटीला जाऊन सौदेबाजी करणारा आमदार नाही.’ महाराष्ट्राची जेवढी बदनामी या खोके प्रकरणाने केली तेवढी आतापर्यंत कोणीच केली नसेल. शिंदे गटातील सर्व कडू, गोड, आंबट, तिखट, तुरट हे खोक्यांच्या नादी लागले पण नाव मात्र महाराष्ट्राचे बदनाम झाले.
अंगावर चित्रविचित्र पोस्टर्सचे कपडे
खोकेवाले आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर अंगावर चित्रविचित्र पोस्टर्सचे कपडे घालून होळीची सोंगं आणली. फक्त पाठीमागे शेपटी लावून माकडउड्या मारायचेच काय ते बाकी होते, बाकी हावभाव विचित्रच होते. आपण आता सत्ताधारी बाकांवर बसून आपणास लोकहिताची, राज्याच्या कल्याणाची कामे पुढे रेटायची आहेत हे खरे म्हणजे त्यांच्या लक्षात राहायला हवे. मात्र त्याचाच विसर या मंडळींना पडावा, हे त्यांच्या चारित्र्यास साजेसे आहे.
Bacchu kadu: “अहो मर्दानगी असेल, तर समोर या आणि पुरावे द्या” बच्चू कडूंचे विरोधकांना आवाहन
खोका आमदारांचा माकडखेळ
आडातच नाही तेथे पोहोऱ्यात कोठून येणार? हाच प्रश्न आहे. राज्याच्या रस्त्यांवर आज फक्त खड्डे आहेत. त्या खड्डय़ांचे रस्ते कधी होणार? मुख्यमंत्री म्हणतात, सर्व रस्ते सिमेंटचे करू. कराल तेव्हा कराल. खोका आमदारांचा माकडखेळ पाहत आपले मुख्यमंत्री उभे राहिले व खोकेवाल्यांची कहाणी सफल झाली. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. दहीहंडीच्या खोकेवाले पुरस्कृत खेळाने अनेक गोविंदांचा मृत्यू झाला आहे, पण सत्ताधारी पक्षाचे ‘खोकेवाले गोविंदा’ विधानसभेच्या पायरीवर बसून हाणामारी करीत राहिले.