TMKOC । ‘तारक मेहता का उल्टा चष्मा बॉयकॉट करा,’ चाहत्यांची संतप्त मागणी; नेमकं कारण काय?

TMKOC

TMKOC । मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ulta Chashma) ही मालिका आज प्रत्येक घरात पोहोचली आहे. अनेक वर्षांपासून ही मालिका सुरु आहे. या मालिकेतील (TMKOC Show) प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खळखळून हसवते. ही मालिका सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येते. काही लोकप्रिय कलाकारांनी या मालिकेला रामराम ठोकला आहे. त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. मागील काही दिवसांपासून ही मालिका वादात सापडली आहे. (Latest Marathi News)

Mumbai Fire । इमारतीला भीषण आग! होरपळून दोघांचा मृत्यू तर ९ जणांना वाचवण्यात यश

आताही ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा बॉयकॉट (Boycott TMKOC) करा, अशी संतप्त मागणी चाहते करू लागले आहे. त्याबाबत तसा ट्रेंड सोशल मीडियावर (Social media) सुरु झाला आहे. मागील काही महिन्यांपासून मालिकेतील दयाबेन गायब झाली आहे. दयाबेन (Dayaben) हे व्यक्तीमत्व साकारणाऱ्या दिशा वकानीने (Direction Vakani) ही मालिका सोडली आहे.

दयाबेन लवकर शोमध्ये परत येईल, असे निर्माते प्रत्येक वेळी चाहत्यांना सांत्वन देत राहिले. परंतु, अजूनही दयाबेन मालिकेत परतली नाही. दयाबेनच्या स्वागतासाठी संपूर्ण गोकुळधाम जय्यत तयारी करताना दिसत आहे. परंतु, आता आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये काही कारणास्तव दयाबेन येऊ शकत नाही असे दाखवण्यात येत आहे. त्यामुळे चाहते संतापले आहेत.

Assembly Election Result 2023 । बिग ब्रेकिंग! चारही राज्यांचे धक्कादायक कल हाती, कुणाला किती मिळाल्या जागा?

Spread the love