Site icon e लोकहित | Marathi News

Satara: साताऱ्यात बुरखा घालून प्रेयसीला भेटायला गेला प्रियकर, मुलं चोरणारी टोळी समजून नागरिकांनी केली बेदम मारहाण

Boyfriend goes to Satara wearing burqa to meet his girlfriend, citizens beat him up mistaking him for a gang of child stealers

सातारा : मागील काही दिवसांपासून राज्यात मुलं चोरणाऱ्या टोळीची (A gang of child stealers) अफवा मोठ्या प्रमाणात पसरली आहे. या अफवेचा नागरिकांवर इतका परिणाम झाला आहे की, नागरिक कोणालाही मुलं चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण (brutal beating) करत आहेत. बऱ्याचवेळा मुलं चोरणारा म्हणून अनेक निरपराधांना लोकांचा मार खावा लागत आहे. याआधी सांगली जिल्ह्यात साधूंना मुलं चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातही एका तृतीयपंथीयाला मुलं पळवणारी टोळी समजून मारहाण केली. दरम्यान आता अशीच एक घटना साताऱ्यात (Satara) घडली आहे.

मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरू करायचाय? मिळतेय बंपर सबसिडी आणि कमवा बक्कळ पैसा

नेमकी घटना काय घडली?

साताऱ्यात एक प्रियकर (boyfriend) बुरखा घालुन आपल्या प्रेयसीला (girlfriend) भेटायला गेला होता. यावेळी त्यालाही मुलं चोरणारा म्हणून मारहाण करण्यात आली. गावातील नागरिकांबरोबरच पोलिसांचाही मार खावा लागला आहे. बुरखा घालून प्रेयसीला भेटायला जायची त्याची ही आयडिया त्याच्यावर भारी पडली.

Malaika Arora: घटस्फोटाबद्दल केलेले मलायका अरोराचे वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “आता आमच्यात चांगले…”

हा व्यक्ती सातारा येथील तामजाईनगरमध्ये बुरखा (wear burkha) घालून आला होता. यावेळी त्याने एका दुकानदाराला एका शाळेचे नाव विचारले. दरम्यान त्या दुकानदाराला संशय आल्याने त्याने त्या व्यक्तीला पकडले. पकडल्यानंतर ही बुरखा परिधान केलेली व्यक्ती ही स्त्री नसून पुरुष असल्याचे दुकानदाराला कळले. दरम्यान हा व्यक्ती मुलं पळवण्यासाठी आला असल्याचा संशय आल्याने नागरीकांनी त्याला मारण्यास सुरुवात केली.

Indonesia: इंडोनेशियात फुटबॉल सामन्यादरम्यान हिंसाचार, 127 जणांचा मृत्यू तर 180 पेक्षा जास्त लोक जखमी

त्यांनतर त्याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्या व्यक्तीला पोलिसांनी कशासाठी आल्याचं विचारल्यावर त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांचा मार बसल्यानंतर त्याचे भांडे फुटले. आपण आपल्या प्रेयसीला भेटायला आलो असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. महत्वाची बाब म्हणजे तो प्रियकर आणि त्याची प्रेयसी हे दोघेही विवाहित आहेत. हे सगळं ऐकून पोलिसांनादेखील धक्का बसला.

मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरू करायचाय? मिळतेय बंपर सबसिडी आणि कमवा बक्कळ पैसा

Spread the love
Exit mobile version