मुंबई : बाऊंड्री वॉलच्या आत बंद करूनही सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) अगदी मस्त जगत होता. असा धक्कादायक खुलासा त्याची कथित गर्लफ्रेंड जॅकलिन फर्नांडिसने केलाय. तुरुंगामध्ये कोणत्याच गोष्टीची सुकेशला कमतरता नव्हती असे अभिनेत्रीने सांगितले . तिथेही त्याला परिधान करण्यासाठी ब्रँडेड कपडे दिले जात होते. एवढेच नाही तर त्याला २४ तास व्हिडिओ कॉलवर उपस्थित राहण्यासाठी सर्व सुविधाही दिल्या जात होत्या.
Chandrakant Khaire: शिंदे गटातील आमदार परत येणार; चंद्रकांत खैरेंचा दावा
दिल्लीतील पीएमएलए अधिकार्यांना दिलेल्या याचिकेत जॅकलीन म्हणाली, ईडीने माझ्यावर आरोप केले आहेत पण मी मनी लाँड्रिंगमध्ये सुकेशला कधीही पाठिंबा दिला नाही. सुरुवातीला मला सांगण्यात आले की सुकेश मोठा माणूस आहे. जॅकलिन पुढे म्हणते, सुकेश आणि मी अनेकदा व्हिडिओ कॉलवर बोलायचो. यादरम्यान तो नेहमी महागडे कपडे परिधान करताना दिसत होता.
Tanaji sawant: तानाजी सावंत ऍक्शन मोडमध्ये, ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर व्यक्त केली नाराजगी
पुढे जॅकलिन म्हणते की, एवढेच नाही तर सुकेश रोज वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसायचा. त्याचे सर्व कपडे खूप महाग आणि ब्रँडेड होते. कारागृहाच्या एका कोपऱ्यात उभा राहून सुकेश अनेकदा व्हिडिओ कॉल करायचा. मात्र अनेकदा सिग्नलची समस्या निर्माण झाली. मी त्याला विचारले असता तो म्हणाला की तो नोएडा येथील त्याच्या एका कारखान्यात काम करतो आणि तेथील सिग्नल खूप खराब आहे.
नेमकं काय प्रकरण आहे?
सुकेश चंद्रशेखरवर 215 कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान अभिनेत्री जॅकलिनचे नाव पुढे आले. अभिनेत्रीने सुकेशकडून अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्याचेही समोर आले आहे. यानंतर अभिनेत्रीवर कारवाई करत ईडीने अभिनेत्रीची ७ कोटी रुपयांची संपत्तीही जप्त केली आहे.