ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल 29 वर्षीय विद्यार्थ्याला अटक

Breaking! 29-year-old student arrested for posting offensive posts about Chief Minister Eknath Shinde and Fadnavis

अहमदनगरमधील (Ahmednagar) एका विद्यार्थ्यांला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट टाकण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. दरम्यान अहमदनगरमध्ये ही कारवाई करण्यात आली असून आरोपीला मुंबईत (Mumbai) स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. तसेच न्यायालयाने (court) आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, सरकारने 50 हजाराच्या प्रोत्साहन अनुदानाच्या ‘या’ जाचक अटी केल्या रद्द

तसेच या प्रकरणात पोलिसांनी अजून काहीजणांचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी शनिवारी त्याला अटक केली. गणेश नारायण गोटे असं या २९ वर्षीय अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. हा आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्याने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासहब महिला खासदार, महिला पत्रकार यांच्याबाबत ट्विटरवर अपशब्द वापरले होते.

आता मोदी सरकार देशात राबवणार ‘एक देश, एक पोलिस वर्दी’ संकल्पना, कारण…

या आरोपीने ट्विटरच्या एका अकाऊंटवरुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला खासदार आणि महिला पत्रकार यांच्याविषयी अपमानास्पद मजकूर प्रसारित केला होता. दरम्यान १४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र सायबर येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल केल्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली.

मोठी बातमी! दूध संघांची पुण्यात बैठक, दुधाचे दर वाढण्याची शक्यता

आरोपीने त्याचा शोध पोलिसांनी घेऊ नये, यासाठी सार्वजनिक वायफाय, हॉटस्पॉट, व्हीपीएनचा वापर करुन अपशब्द असलेला मजकूर प्रसारित केला होता. दरम्यान तांत्रिक पुराव्याच्या आधारे महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नगर येथील राहुरीमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठात शुक्रवारी धाड टाकून दोन संशयितांना ताब्यात घेतले. दरम्यान शनिवारी त्यांना मुंबईत आणण्यात आले. तसेच या प्रकरणी तपासाअंती गणेश गोटे (२९) वर्षे याला अटक करण्यात आली.

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत, पालकमंत्री लोढा यांनी घेतली पीडितांची भेट

दरम्यान तपासात दोन मोबाइल, एक लॅपटॉप जप्त करण्यात आले. त्याचे तांत्रिक विश्लेषण करुन संशियताने प्रसारित केलेला मजकूर आणखी कोणाकडून तयार करुन घेतला आहे का, याबाबत तपास सुरु आहे. दरम्यान या आरोपीला न्यायालयाने २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

पुणेकरांनो सावधान! आता थंडीचा कडाका वाढला असून पारा 12.6 अंशावर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *