मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये काल गुरूवारी इंदूरच्या स्नेह नगरमध्ये एका विहीरी वरील छत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती. माहितीनुसार, विहीर अनेकवर्ष जुनी असल्याने लोकांना वाचविण्यासाठी वेळ लागत आहे. यासाठी लष्कराचे ७५ लोक आले असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम देखील तैनात आहे.
धक्कादायक! विधानसभेत पॉर्न व्हिडीओ पाहताना पकडला गेला भाजपचा आमदार; व्हिडीओ व्हायरल
आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपघातामध्ये जवळपास 35 जणांचा मृत्यू झालाची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती जिल्हाधिकारी इलैया राजा टी यांनी दिली आहे. तर एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. अजून देखील या ठिकाणी शोधकार्य चालू आहे.
शेतकऱ्यांची चिंता काही थांबाणा! आज आणि उद्या राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता
दरम्यान, काल मध्य प्रदेशातील इंदूरच्या ठाणे जुनी येथील पटेल नगर या ठिकाणी शिवमंदिरातील विहिरीचे छत कोसळल्याची घटना घडली. यावेळी अनेक लोक विहिरीत पडले होते. विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न चालूच आहेत.
सर्वांत मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा केल्याप्रकरणी ४०० ते ५०० जणांवर गुन्हे दाखल