Site icon e लोकहित | Marathi News

ब्रेकिंग! पुण्यात खडकवासला धरणात ९ मुली बुडाल्या, ७ मुलींना वाचविण्यात यश तर २ मुली बेपत्ता

Breaking! 9 girls drowned in Khadakwasla dam in Pune, 7 girls were rescued and 2 girls went missing

सध्या उन्हाळा ऋतू चालू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात गरम होत असते. या गर्मीपासून वाचण्यासाठी अनेकजण थंड पाणी पितात, काहीजण पोहण्यासाठी विहिरीत तसेच तलावात जात असतात. मात्र अशावेळी काही धक्कादायक घटना देखील घडत असतात. सध्या देखील पोहण्यासाठी पुण्यातील खडकवासला धरणामध्ये गेल्याने मुली बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 9 girls drowned in Khadakwasla dam in Pune, 7 girls were rescued and 2 girls went missing

धक्कादायक घटना! लिफ्टमध्ये मान अडकल्याने १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

पोहण्यासाठी खडकवासला धरणामध्ये गेलेल्या ९ मुली पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. या 9 मुलींपैकी 7 जणींना वाचवण्यात यश आलं असून दोन मुली अजूनही बेपत्ता आहेत. त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांच्या मदतीमुळे सात मुलींचा जीव वाचला आहे.

Cabinate Expansion | शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच! ‘या’ मोठ्या नेत्याने केला खुलासा

या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्याचबरोबर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सध्या त्या दोन मुलींना शोधण्याचे काम चालू आहे. मुलींबाबत घडलेल्या या घटनेने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

शेतकऱ्यांनो फळबाग लावायचा विचार करताय? तर मग ही बातमी तुमच्यासाठी; सरकार देतंय अनुदानासह मोफत रोपे

Spread the love
Exit mobile version