सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Pune-Mumbai highway) एक खासगी बस दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये ७ ते ८ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर या घटनेत २० ते २५ जण जखमी झाले आहेत.
IPL 2023 : जखमी असून देखील ऋषभ पंतने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल दाखल झाले. त्याचबरोबर तेथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने लोकांना वाचविण्यात यश आले आहे. मात्र सर्व लोक अजून बाहेर निघाले नसून काही लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरघाटातील शिंगरोबा मंदिर जवळ पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील युवा शेतकऱ्याची कमाल! केली पिवळ्या कलिंगडाची लागवड
ही खासगी बस पुण्याहून मुंबईला निघाली होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर ही बस दरीत कोसळली. हा अपघात पहाटेच्या वेळी झाला त्यामुळे अनेक प्रवाशी गाढ झोपेमध्ये होते. या बसमध्ये जवळपास ४० ते ४५ लोक आहे. अजून देखील बचावकार्य सुरु आहे.