
सध्या आयपीएल सुरु आहेत यामध्येच आता क्रिकेटर पृथ्वी शॉ (Cricketer Prithvi Shaw) याच्याविरोधात सपना गिलने (Sapna Gill) पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पृथ्वी शॉच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांविरोधात सपना गिलने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी भरसभेत केली एकनाथ शिंदेंची नक्कल!
दरम्यान मागच्या काहीदिवसापूर्वी पृथ्वी शॉ आणि सपना गिल हे प्रकरण चांगलेच चर्चेत होते. यांच्यामध्ये सेल्फीवरून वाद झाला होता. यावेळी सपना गिलने क्रिकेटर पृथ्वी शॉ याच्यावर गंभीर आरोप देखील केले होते.
बुलेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Royal Enfield Bullet 350 लवकरच होणार लाँच
“पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांनी मला बेसबॉलने मारहाण केली. त्याचबरोबर माझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावला आणि मला चापटही मारली,” असे गंभीर आरोप सपनाने केले होते. मात्र सध्या पृथ्वी शॉ याच्याविरोधात सपना गिलने पोलिसात तक्रार दाखल केल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
“हे सरकार काही महिन्यांचं नाही, काही दिवसांचं नाही तर काही तासांच….”, आदित्य ठाकरे यांचं भाकीत