आजपासून पावसाळी अधिवेशनाला (Monsoon session) सुरुवात होणार आहे. परंतु त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे असणारी खाती इतर मंत्र्यांना देण्यात आली आहेत. अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच ही खाती मंत्र्यांना दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महत्त्वाचे म्हणजे ही खाती भाजप (BJP), राष्ट्रवादी पक्षाला (NCP) न देता शिंदे गटाच्या आमदारांना देण्यात आली आहेत. (Latest Marathi News)
पावसाचा कहर सुरूच! कुठे वाहने बुडाली, तर कुठे रस्त्याला भले मोठे खड्डे पडले
यामध्ये उदय सामंत (Uday Samantha) यांच्याकडे नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञान, गुलाबराव पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन, अब्दुल सत्तार यांच्याकडे खनिकर्म, शंभूराज देसाईंकडे सामाजिक न्याय आणि दिव्यांग, दादा भूसे यांना परिवहन आणि दीपक केसरकर यांच्याकडे पर्यावरण खाते दिले आहे. नुकतेच अजित पवार (Ajit Pawar) गटामधील मंत्र्यांचे खातेवाटेप झाले आहे. त्यांच्याकडे मातब्बर खाती आल्याचे बोलले जात आहे.
Katrina kaif Birthday | कधीच शाळेत न जाणारी कतरिना आज घेते बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त मानधन
दरम्यान, आज पावसाळी अधिवेशनाच पहिला दिवस आहे. हे अधिवेशन १५ दिवस मुंबईत चालणार असून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण विरोधक सत्ताधारी पक्षांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरून घेराव घालू शकतात. त्यामुळे आता हे अधिवेशन सत्ताधारी की विरोधक गाजवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.