
शिंदे गटाच्या चोपडा तालुक्याच्या आमदार लताताई सोनवणे (Latatai Sonawane) आणि माजी आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे (Chandrakant Sonawane) यांचा काल (ता.२७) रात्री अपघात झाला आहे. जळगावच्या करंज गावाजवळ हा अपघात झाला. गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरने दिलेल्या धडकेत आमदारांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. (Car accident)
शुभमन-साराचा ब्रेकअप? गिलचा ‘तो’ व्हिडीओ पुन्हा एकदा होतोय व्हायरल
या अपघातामध्ये सुदैवाने आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांना गंभीर दुखापत झालेली नाही. त्यांना फक्त मुकामार लागला असून किरकोळ जखमा झाल्या आहेत. अशी माहिती आमदारांचे स्वीय सहाय्यक गणेश भोईटे यांनी दिली आहे.
तब्बल २२ वर्षांनंतर सासू आणि जावयाचे अफेअर उघडकीस, वाचून तुम्हालाही बसेल धक्का
काल (ता. २७) दोन्ही आमदार काही कार्यक्रमांसाठी बाहेर गेले होते. यावेळी त्यांच्या हस्ते कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. हा भूमिपूजन कार्यक्रम आटोपून संध्याकाळी त्यांच्या खाजगी वाहनाने चोपडा येथून खेडीभोकरी भोकर मार्गे जळगाव येथे निघाले होते. यावेळी गौण खनिज वाहणाऱ्या डंपरने आमदारांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही आमदार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यात आले आहेत.
पुणेकरांसाठी मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे खड्डे नसतानाही JM रोड उकरला जाणार…