एखादी व्यक्ती प्रसिद्धीस आली की तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतोच. ‘बिगबॉस’ ( Bigboss) मधून मागील काही दिवसांत प्रकाशात आलेल्या उर्फी जावेदला बलात्कार व जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर उर्फीने पोलिसांत तक्रार दिली असून एकाला अटक देखील करण्यात आली आहे.
कोयता गँगची दहशत मोडीत काढा; अजित पवारांचे ट्विट चर्चेत, अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित केला
नवीन रंजन गिरी याने उर्फी जावेदला ( Urfi Javed) बलात्कार व जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबतची माहिती उर्फीने गोरेगाव पोलिसांत देताच, रंजन गिरी याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर विनयभंग, अश्लील संभाषण करणे, धमकी देणे तसेच आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बहिरोबावाडीच्या सरपंचपदी कोमल शरद यादव विजयी
मागील 15 दिवसांमध्ये नवीन गिरीने उर्फी जावेदला मोबाईल वर कॉल करून व whatsapp वर संदेश पाठवून बलात्कार करण्याची व ठार मारण्याची धमकी दिली होती. यामध्ये अश्लील भाषेचा वापर करण्यात आला होता. म्हणून पोलिसांनी नवीन गिरीविरुद्ध विनयभंगासह अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणे आदी भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
ब्रेकिंग! कोरोना पुन्हा वाढला; देशात 131 नवे कोरोनाबाधित
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता, नवीन रंजन गिरी व उर्फी जावेद यांच्यात भाड्याच्या पैशावरून वाद झाला होता. याच वादातून नवीन रंजनने अश्लील संभाषण करून बलात्काराची धमकी दिली होती. या प्रकरणी नवीन रंजन गिरी याला न्यायालयात सादर केले असता, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.