अचानक तब्बेत बिघडल्याने प्रसिद्ध गायक आणि अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आता चित्रपटातही गाणार अमृता फडणवीस, नवीन गाणं झालं रिलीज! पाहा VIDEO
अन्नू कपूर यांच्या मॅनेजरनं एका वृत्तसंस्थेला माहिती देताना म्हटलं की, “अन्नू कपूर यांना अचानक छातीमध्ये दुखत होतं म्हणून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही, कंजेशन होतं, त्यामुळे आता सध्या त्यांची तब्बेत ठीक आहे.”
बारामतीमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक पदाधिकारी व कार्यकत्यांनी केला शिंदे गटात प्रवेश
दरम्यान, अन्नू कपूर अभिनेतेच नाहीत तर ते एक प्रसिद्ध गायक देखील आहेत. त्याचबरोबर ते दिग्दर्शक, रेडिओ जॉकी आणि टीव्ही होस्टही आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटनामध्ये काम केले आहे. जवळपास १०० पेक्षा जास्त चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्यांनी अनेक पुरस्कार देखील जिंकले आहे.
टीम इंडियाला धक्का! दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड मालिकेतून बाहेर