
अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाते. राखी ही टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. राखी सावंत सोशल मीडियावर तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. इतकंच नाही तर राखी सावंत लोकांचे मनोरंजन करण्यात आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात नेहमीच अग्रेसर असते. दरम्यान राखीने काही दिवसांपूर्वी आदिल दुर्रानीसोबत लग्न केले आहे. आता राखीच्या खासगी आयुष्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या आहेत.
बिग ब्रेकिंग! बृजभूषण सिंह यांच्यावर ‘सेक्स स्कॅण्डल’चे गंभीर आरोप
सध्या राखी सावंतच्या गर्भपात झाला अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. विरल भयानी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आलेली आहे. आणि या पोस्टच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, ‘राखी सावंत ही नेहमीच आपल्याला हसवते. मात्र आता राखीला सध्या खूप वेदना होत आहेत. तिच्या आईच्या तबेटीबाबत आणि वैयक्तिक आयुष्याबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे”.
लाख रुपये पगार असणारी नोकरी सोडून मुलीने सुरु केली चहाची टपरी!
त्याचबरोबर पुढे पोस्टमध्ये लिहिले की, “राखीने मला फोनवर सांगितले की, यश भाऊ, मी प्रेग्नंट होते आणि मी बिग बॉस मध्ये देखील हे सांगितले पण सगळ्यांना हा मजाक वाटला. त्यामुळे याकडे कोणी लक्ष दिले नाही.” तिचा गर्भपात झाल्याची माहिती तिनं दिली आहे. त्यामुळे या इंस्टाग्राम पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मात्र खर्च राखीचा गर्भपात झाला आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. मात्र याबाबत राखीने कोणतंही माहित दिलेली नाही.
शरद पवारांचा अजित पवारांवर विश्वास नाही; केंद्रीय मंत्र्याने केला गौप्यस्फोट