मागच्या काही दिवसापूर्वी राखी सावंतने आदिल खानवर (Adil Khan) गंभीर आरोप केले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात असतानाच आदिलचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर सुरू असल्याचं राखी सावंत (Rakhi Sawant) म्हणाली आहे. दरम्यान आता राखीने त्या मुलीचे नाव देखील उघड केले आहे. राखीने दिलेल्या माहितीनुसार आदिल खानच्याच्या गर्लफ्रेंडचे नाव तनु असे आहे.
आईच्या निधनाबाबत राखीने अदिलखानवर गंभीर आरोप केले आहेत. राखी म्हणाली, “आदिलमुळे माझी आई जिवंत नाही, आदिलने तिच्या उपचारासाठी पैसे दिले नाहीत. जर माझ्या आईवर वेळीच उपचार झाले असते, तर माझी आई कदाचित आज जिवंत असती”, असं राखी म्हणाली आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत हायहोल्टेज ड्रामा! उमेदवारी न दिल्याने राहुल कलाटे करणार बंडखोरी
त्याचबरोबर राखी म्हणाली, “आदिलविरोधात कर्नाटकमधील म्हैसूर इथं अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला पोलिसांनी १ तारखेला उचलून नेले होते. त्याचबरोबर त्याला दोन दिवस तुरुंगामध्ये देखील ठेवण्यात आलं होतं. त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत”. असा गौप्यस्फोट राखी सावंतने माध्यमांशी बोलताना केला आहे.
बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर नाना पटोले यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…