आज सकाळी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची बातमी ताजी असतानाच आता मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंडे यांना धमकीचा फोन आला आहे.
Petrol Diesel Price । पेट्रोल आणि डिझेलचे दर झाले कमी! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
धनंजय मुंडे यांच्या परळीच्या घरी धमकीचा फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता सगळीकडे खळबळ उडाली आहे. या धमकीच्या फोनमध्ये लाखो रुपयांची मागणी देखील करण्यात आली आहे. आज सकाळपासून राज्याच्या राजकारणामध्ये धमकीच्या फोनचीच चर्चा होताना दिसत आहे. (Breaking News)
धक्कादायक! चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू तर 12 जण गंभीर
छगन भुजबळ यांनाही धमकीचा फोन
अजित पवारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेले नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एका अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे. छगन भुजबळ यांच्या कार्यालयात फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. छगन भुजबळ यांना रात्री साडे अकराच्या सुमारास धमकीचा फोन आला.
PM Kisan Yojana । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 2000 रुपये