जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणारे अदानी चांगलेच आपटले आहेत. शेअर मार्केट मध्ये कधीकाळी वर्चस्व गाजवणाऱ्या अदानी एंटरप्राईझेसला अमेरिकन शेअर मार्केट डॉ जॉन्समधून काढण्यात आले आहे. या निर्णयानंतर भारतात देखील अदानी एंटरप्राईझेसच्या शेअरला लोअर सर्किट लागला आहे. यामुळे अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्समध्ये झपाट्याने घसरण होत आहे. इतकंच नाही तर अदानी पोर्टमध्ये 10 टक्क्यांनी घसरण झाली आहे. आता अदानी समुहाला बसलेल्या फटक्याची चर्चा चालू असतानाच दुसरीकडे रामदेव बाबाच्या पतंजली फूड्सच्या (Patanjali Foods) लिस्टेड कंपन्यांच्या गुंतवणूकदारांनाही मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी! अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या कारला भीषण अपघात
माहितीनुसार,रामदेव बाबाच्या पतंजली फूड्सच्या शेअर्सचे भाव मागच्या आठवड्यापासून सतत घसरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे जवळपास ७००० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
तुम्ही बंडखोरी करताना कोणाला सांगितलं? राम शिंदे यांचा अजित पवारांना सवाल
पतंजली कंपनीच्या शेअर्सचा (Shares of Patanjali Company) भाव हा आठवडाभरापूर्वी हजारांच्यावर होता. २७ जानेवारीला शेअर्सचा भाव ११०२ रुपये इतका होता. यावेळी कंपनीचं मूल्य ४० हजार कोटी असून आठवडाभरात कंपनीचं एकूण मूल्य जवळपास ७००० कोटींपेक्षा जास्त कोसळले आहे.
“…म्हणून सत्यजित तांबेंची चौकशी व्हावी”, काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याने केली मागणी