
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत (NCP) बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्यासोबत 9 सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. वर्षभरापूर्वी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारवर टीका करणारे अजितदादा आज त्यांच्याच सोबत सत्तेत सहभागी झाल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भूकंप आला आहे. राज्यातील राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत.
Accident | सर्वात भीषण अपघात! दरीमध्ये बस कोसळून २७ प्रवासी ठार
अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. त्याचबरोबर अजित पवार लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याच्या देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.
अजित पवार खरंच मुख्यमंत्री होणार का? एकनाथ शिंदे राजीनामा देणार का? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची जोरदार चर्चा रंगली आहे. आता या सर्व चर्चांवर राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला धोका नाही. अजित पवार मुख्यमंत्री होणार ही फक्त अफवा आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
शेतकऱ्यांनो करा ‘या’ तांदळाची शेती, किलोला मिळेल 500 रुपये भाव