
मुंबई: मागील एक वर्षांपासून माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख अटकेत आहेत. आधी ईडी आणि त्यानंतर सीबीआयकडून ( ED & CBI) भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्याने देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून अटकेत होते. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांचा जामीन मंजूर केला आहे. मात्र इतक्यात त्यांची सुटका होईल अशी चिन्हे दिसत नाहियेत. कारण, सीबीआयच्या विरोधानंतर न्यायालयाने दहा दिवसांसाठी म्हणजे 22 डिसेंबरपर्यंतल देशमुख यांच्या जामीनाला स्थगिती दिली होती.
इंदुरीकर महाराजांच्या घरी गुलाल ! कुटुंबातील ‘ही ‘ व्यक्ती झाली सरपंच
अनिल देशमुख यांच्या जामिनावर उद्या हायकोर्टात सुनावणी होणार आहे. देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना मात्र हायकोर्टाकडून दोन लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मिळाला आहे. मात्र अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच पालांडे यांची देखील सीबीआयच्या केसमध्ये अटक झाल्याने पालांडे यांचीसुद्धा कारागृहातून सुटका होणार नाही. अनिल देशमुख यांच्या जामिनावर सीबीआयने केलेल्या विरोधानंतर न्यायालयाने दहा दिवसांसाठी जामीनाला स्थगिती दिली होती.
राष्ट्रपतींना मिळतो लाखोंचा पगार; जोडीदारासाठी सुद्धा दिल्या जातात ‘या’ खास सुविधा!
ही स्थगिती वाढवण्यासाठी सीबीआयने आता हायकोर्टात धाव घेतली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात यंदा सुट्टीकालीन कोर्ट उपलब्ध नसल्यामुळे 3 जानेवारीपर्यंत ही स्थगिती वाढवण्याची सीबीआयकडून विनंती करण्यात येणार आहे. याबाबत अद्याप कोर्टात सुनावणी झाली नाही. यामुळे अनिल देशमुख यांचा कारागृहातील मुक्काम वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशमुख जामीन अर्जावर निकाल दिल्यानंतर 10 दिवसांच्या आत ही सुनावणी होणे गरजेचे आहे. अन्यथा, अनील देशमुखांचा जामीन लागू होऊन त्यांची कारागृहातून सुटका होईल.
तेजस्विनी पंडितचा मोठा खुलासा; थेट नगरसेवकानेच दिली ‘ही’ ऑफर