
मणिपूरमधील (Manipur) हिंसाचार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. जमावाने इंफाळ पॅलेस मैदानाजवळील गोदामाला आग लावली आणि नंतर भाजप (BJP) नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हिंसक लोकांनी तेथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशीही झटापट केली.
दिवसाढवळ्या तरुणाने केली महिलेला बेदम मारहाण; व्हिडीओ झाला व्हायरल
मणिपूरच्या रॅपिड अॅक्शन फोर्सच्या (आरएएफ) जवानांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोक त्यांच्याशी भिडले. पोलिसांनी सांगितले की, जमावाने परिसरातील इतर खाजगी मालमत्तांना जाळण्याचा प्रयत्न केल्याने आरएएफच्या जवानांनी जमावाला पांगवण्यासाठी अंधाधुंद गोळ्या देखील झाडल्या.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची घरासमोरच नेमकी कशी झाली हत्या? अंगावर शहारे आणणारी घटना
काही आंदोलकांनी आमदार विश्वजितसिंह यांच्या घराला आग लावण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी जवानांनी त्या लोकांना पांगवण्याचा प्रयत्न देखील केला. भाजपच्या कार्यालयाला शनिवारी रात्री जमावाने घेराओ घातला होता पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लष्करी बंदोबस्त होता त्यामुळे ते या ठिकाणी पोहचू शकले नाही.
Nitin Gadkari On Congress । ‘एकवेळ विहिरीत उडी मारून जीव देईल पण काँग्रेसमध्ये कदापि जाणार नाही’