महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवारांनी ( Sharad Pawar) अदानी प्रकरणात भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकिय भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ( NCP) मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य, संजय राऊत एकनाथ शिंदे गटात येणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राष्ट्रवादी सोबत ममता बॅनर्जी यांचे तृणमूल काँग्रेस व सीपीआय या पक्षांचा देखील राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी याबाबत घोषणा केली. यामुळे इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व सीपीआय हे तिन्ही पक्ष फक्त प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत.
मारुतीची ‘ही’ हॅचबॅक कार ठरतीये लोकांची विशेष पसंती; जाणून घ्या काय आहेत फिचर्स
निवडणूक आयोगाने असा निर्णय का घेतला असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र मागील काही वर्षांतील राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी पाहून हा निर्णय घेतला गेला आहे. 2014 नंतरच्या सलग दोन लोकसभा निवडणुका आणि 2019 नंतर 21 पैकी 12 राज्यांच्या विधानसभेत राष्ट्रवादीची कामगिरी लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने NCP चा राष्ट्रीय दर्जा काढला आहे.
पुणे लोकसभा पोटनिवडणूकीसाठी रवींद्र धंगेकर मैदानात उतरणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण