पुणे : राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या-मोठ्या हालचाली होत आहेत. नुकत्याच काही पदवीधर मतदारसंघांच्या निवडणूका पार पडल्या. अशातच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्येच आता कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आली आहे.
भाजपकडून कसबा मतदार संघासाठी हेमंत रासने तर चिंचवड मतदार संघासाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत अनेक चर्चा चालू होत्या मात्र आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.
मोठी बातमी! नाशिकच्या गोल्डमॅनला 22 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याखाली अटक
दरम्यान, या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी व भाजप समोरा समोर लढणार आहेत. कसबा व चिंचवड ( Kasba & Chinchwad Elections) येथील निवडणुका बिनविरोध होतील. अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. या निवडणुकांसंदर्भात काल तिन्ही पक्षांची बैठक पार पडली.
महाविकास आघाडीत कोणताच मतभेत नाही, आमचा सर्वांचा राजकीय शत्रू एकच; संजय राऊतांचे वक्तव्य चर्चेत