समृद्धी महामार्गावरील (Prosperity Highway) अपघाताची (accident) मालिका काही संपण्याचा नाव घेत नाही. सतत या महामार्गावर अपघात घडत आहेत. वाहनाचे टायर फुटून, वन्यप्राणी आडवे येऊन समृद्धी महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. दरम्यान सध्या समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे.
Ajit Pawar | अजित पवारांनी थेट हॉटेल मालकाला उभे केले शॉवरखाली! कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
कार नागपूरवरून मुंबईकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने रेलिंगला धडकली. त्यानंतर कारला आग लागली. आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरु आहेत. हा अपघात रात्रीच्या सुमारास घडला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव कोळ या ठिकाणी हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होती की, यामध्ये कारला आग लागली. आणि या आगीमध्ये दोन जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. ही कार नागपूरवरून शिर्डीच्या दिशेने जात होती.
IPL Final | आयपीएलच्या फायनल मॅचला पावसाची हजेरी! आता ‘या’ तारखेला होणार सामना
या कारमध्ये तीन जण प्रवास करत होते. त्यामधील दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये कार जळून पूर्णपणे खाक झाली आहे.
बिग ब्रेकिंग! चेन्नई सुपर किंग्सच्या ‘या’ बड्या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, ट्विट करत म्हणाला…