येत्या काही दिवसांमध्ये पश्चिमच्या बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाल्याने अनेक भागांमध्ये पाऊस झाला यामुळे अनेकांची धावपळ झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परंतु हा पाऊस झाल्यामुळे नागरिकांना उकड्यापासून देखील सुटका मिळाली. हवामान विभागाने जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याचे सांगितले आहे. यंदाचा मान्सून हा केरळमध्ये दाखल होणार असून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पिकांची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे.
जून महिन्यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद तसेच विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा जास्त पाऊस पडणार असून शेतकऱ्यांनी तात्काळीने पेरणी करण्यास सुरुवात करावी असा अंदाज हवामान खात्याच्या विभागने सांगितला आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मुंबई आणि कोकणाचे वातावरण तसेच राहणार असून त्यामध्ये काहीच बदल होणार नाही. तसेच ढगाळ वातावरण हे पुणे, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
२२ हजारांचा LG Smart TV मिळणार फक्त १३ हजारांमध्ये, पाहा धमाकेदार ऑफर
उत्तर महाराष्ट्रामध्ये कडाक्याचे ऊन राहील. नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव आणि अहमदनगर या मध्य आणि दक्षिण भारतात दाट पावसाची शक्यता सांगितली आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे पिक पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. व यंदाच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान न होता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन होईल व शेतकऱ्यांना त्याचा नफा मिळेल असा अंदाज हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.