काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी केलेल्या मोठ्या राजकीय बंडानंतर शिवसेना ठाकरे गट व शिंदे गट यामध्ये विभागली गेली. तेव्हापासून शिवसेना नक्की कुणाची यावर वाद सुरू आहेत. तसेच धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार हे सुद्धा अजूनही स्पष्ट झाले नाही. दरम्यान, यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली.
Sushant Singh: सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाला पुन्हा एक मोठा धक्का
या सुनावणीवेळी शिंदे गट आणि ठाकरे गट (Shinde group and Thackeray group) या दोन्ही गटांकडून युक्तीवाद करण्यात आला. यामध्ये शिंदे गटाच्या 7 जिल्हा प्रमुखांवर ठाकरे गटानं आक्षेप नोंदवलाय त्यामुळे जर हा आक्षेप खरा ठरला तर शिंदे गट अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मोठी बातमी! लग्नाच्या वरातीतही कोयता गँगने घातला राडा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगासमोर (Election Commission) ठाकरे गटाने शिंदे गटाच्या सात जिल्हा प्रमुखांच्या कागदपत्रांमध्ये त्रृटी आहेत असा केलाय. शिंदे गटाच्या वकिलांनी यामध्ये त्रुटी नसल्याचे सांगितले मात्र ठाकरे गटानं या त्रुटी शोधून काढल्या आहेत. यामुळे शिंदे गटाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशद! झोपलेल्या नागरिकावर कोयत्याने वार