Site icon e लोकहित | Marathi News

ब्रेकिंग! प्रसिद्ध कोरियन अभिनेत्रीचा मृत्यू; वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Breaking! Death of Famous Korean Actress; He took his last breath at the age of 26

सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण कोरियन प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल जंग चाये युल (South Korean famous actress and model Jang Chae Yul) हिचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. या अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. जंग चाये युल या अभिनेत्रीच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे.

बैलगाडा शर्यतीचा थरार जिंकून बक्षिसात मिळवली थार!

या अभिनेत्रीचा मंगळवारी तिच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आला आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. २०१६ मध्ये डेव्हिल्स रनवे या मालिकेतील भूमिकेमुळे तिने पहिल्यांदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं. त्यांनतर ती सोशल मीडियावर देखील सतत चर्चेत राहिली.

अजित पवार खरंच भाजपासोबत जाणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पाऊस पडेल…”

त्याचबरोबर २०२० मध्ये झोम्बी डिटेक्टिव्ह या नाटकातील बे यून-मी च्या भूमिकेसाठी तिला चांगलीच ओळख मिळाली. ही अभिनेत्री इंस्टाग्रामवर देखील खूप सक्रिय होती. आपले फोटो व्हिडीओ शेअर करत ती नेहमीच चाहत्यांसोबत संपर्कात राहायची. तिच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

जीवाला धोका असल्याच्या तक्रारीवर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Spread the love
Exit mobile version