ब्रेकिंग! राज्य सरकार बरखास्त करा, काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याने केली मागणी

Breaking! Dismiss the state government, this big Congress leader demanded

मुंबई (Mumbai) येथे (ता.१६) महाराष्ट्र भूषण पुरस्कार पार पडला. जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना हा पुरस्कार देण्यात आला असून यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह ( Amit Shah) उपस्थित होते. थाटात पार पडलेल्या या सोहळ्याला एका गोष्टीमुळे गालबोट लागले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अनेक लोकांना उष्माघाताचा त्रास झाला. ( Heat Stroak) यामुळे ११ जणांचा मृत्यु झाला असून 19 जणांवर उपचार सुरू आहेत. यांनतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले.

अजित पवारांच्या बंडखोरीवर शरद पवारांनीच पडदा पाडला! पडद्यामागे केल्या ‘या’ हालचाली…

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा मागावा अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारच बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

अजित पवार व संजय राऊत यांच्यात वादाची ठिणगी! आरोप -प्रत्यारोप झाले सुरू…

नाना पाटोले यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमूळे? खोके सरकार नक्की काय लपवतंय? या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करतो.”

राजकीय घडामोडींना वेग! अजित पवार यांनी बोलावली आमदारांची बैठक

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *