मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या वर्षा निवास्थानी शिवसेना खासदारांची तातडीची बोलावली असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला खासदार उपस्थित असणार आहेत. यामध्ये लोकसभा निवडणुकीवर (Lok Sabha Elections) चर्चा होणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुकेश अंबानींच्या कुटुंबामध्ये कोण जास्त शिकलंय? वाचा सविस्तर…
2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मतदारसंघातील प्रलंबित कामांचा आढावा देखील घेतला जाणार आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांच्याविरोधात आणलेल्या हक्कभंगावर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोठी बातमी! अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आईच निधन
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून खासदारांना जबाबदाऱ्या देखील देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या बैठकीचा तपशील कोणालाही दिला नाही. त्यामुळे बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पुन्हा राज्यात पावसाची शक्यता; 13 ते 15 मार्चदरम्यान ‘या’ ठिकाणी पडणार पाऊस