
सध्या कांद्याची (Onion) स्थिती ही खूपच बिकट झाली आहे. तरी देखील कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. आता याबाबत शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे.
समोश्याबद्दल ‘ही’ माहिती तुम्हाला माहिती आहे का? कधीही न ऐकलेली माहिती वाचून व्हाल थक्क
आता शेतकऱ्यांना ३० एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहेत. अनेकजण अर्ज करण्यापासून वंचित राहतील म्हणुन पणन संचालक कार्यालयाने मुदतवाढ देण्याचे आदेश आज काढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.
संरक्षणमंत्री कोरोना पॉझिटिव्ह; कोरोना रुग्णांची संख्या वाढली
राज्यातीमधील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार समित्यांमध्ये, पणन अथवा नाफेडकडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च मध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा अनुदान योजनाचा अर्ज भरणे आवश्यक आहे.
आराध्यासाठी बच्चन कुटूंबाने घेतली उच्च कोर्टात धाव; खोट्या बातमीमुळे उचलले ठोस पाऊल