सध्या एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. मेटा इंडिया कंपनीने एक महत्वाची घोषणा केली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची (Facebook, Instagram and WhatsApp) मूळ कंपनी असलेल्या मेटा इंडियाच्या प्रमुखपदी संध्या देवनाथन (Sandhya Devanathan) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता इथून पुढे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचा कारभार संध्या देवनाथन या पाहणार आहेत.
मोठी बातमी! अज्ञात आंदोलकांनी ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पेटवला
मेटानं गुरुवारी याबाबत घोषणा केली आहे. मेटा इंडियाचे अध्यक्ष अजित मोहन (Ajit Mohan) यांनी या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. संध्या देवनाथन या १ जानेवारी २०२३ पासून कारभार पाहणार आहेत. महत्वाचं म्हणजे संध्या देवनाथन या गेमिंग एक्सपर्ट असून महिलांना या क्षेत्रात येण्यासाठी त्या प्रोत्साहित करत आहेत.
हृदयद्रावक! १० महिन्याच्या चिमुकलीचा अंगावर गरम पाणी सांडून मृत्यू
२०१६ पासून संध्या देवनाथन या फेसबुकसोबत कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्यांनी २०२० मध्ये APAC क्षेत्रात गेमिंगचं नेतृत्व केलं आहे. त्यामुळे आता गेमिंग इंडस्ट्रीत काम करण्यासाठी मेटा कंपनीने (Meta Company) प्ले फॉरवर्ड हा एक मोठा प्रोजेक्ट उभारला असून त्याचं गोल्बली लीड संध्या करत आहेत.
आंदोलन करून प्रश्न सुटले नाहीत तर १८ तारखेपासून काय करायचे ते सांगतो; राजू शेट्टींचा गंभीर इशारा