सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मनसेचे नेते, माजी नगरसेवक संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर यांच्यावर शिवाजी पार्क येथे हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामध्ये संदीप देशपांडे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
बिग ब्रेकिंग! सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका
संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला कोणी केला हे अजून स्पष्ट झालेल नाही. हल्लेखोर मास्क लावून आले आणि हल्ला करून पसार झाले आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
घटना घडली अशी की, संदीप देशपांडे हे दररोज मॉर्निंग वॉकला शिवाजी पार्क येथे जातात. आज देखील ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला आले होते. यावेळी अचानक काही अज्ञात लोक तोंडाला मास्क लावून आली आणि संदीप देशपांडे यांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यामुळे देशपांडे जखमी झाले असून रुग्णालयात उपचार सुरु आहे.
शाळकरी मुलीच ‘ते’ प्रेमपत्र सोशल मीडियावर व्हायरल; मुलगी लिहिते की, “मी तुला नाही म्हणाले पण…”
संदीप देशपांडे यांना तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी वाचविण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हल्लेखोर पसार झाले. देशपांडे जखमी झाले आहे. मात्र त्यांची परिस्थिती गंभीर नसल्याची देखील माहिती समोर आली आहे. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला पूर्वनियोजित कटाचा एक भाग असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
चिंचवडमध्ये पराभव होताच नाना काटेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या प्रमाणावर पैशांचा…”