सध्या अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, अमेरिकेत अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली घडली आहे. यामुळे त्या ठिकाणी खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील टेक्सासमधील डॅलसजवळील एका शॉपिंग मॉलमध्ये एक बंदूकधाऱ्याने शॉपिंग मॉलमध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण जखमी झाले आहेत. (A gunman opened fire in a shopping mall near Dallas, Texas, USA)
माहितीनुसार, या घटनेमध्ये जखमी झालेल्या लोकांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. यामध्ये हल्लेखोराला देखील ठार करण्यात आलं आहे. पोलिसांनी हल्लेखोराच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं आणि त्यात या हल्लेखोराला ठार केलं आहे. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर तुफान होत आहेत.
Google Update । तुम्हीही सर्च करण्यासाठी गुगलचा वापर करता का? समोर आली मोठी अपडेट; एकदा वाचाच
या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये रक्ताच्या थारोळ्यात लोक पडलेली दिसत आहेत. आता जखमी लोकांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे, दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून अमेरिकेत गोळीबाराच्या घटना घडत आहेत. गेल्या वर्षी देखील अमेरिकेत गोळीबारात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.