
Kolhapur Flood | कोल्हापूर : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने चांगलाच जोर (Heavy Rain) धरला आहे. ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. नदी-नाल्यांना पूर (Flood) आल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी तर दरड कोसळल्याच्या (Landslide) घटना घडल्या आहेत. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्गही अडचणीत आला आहे. (Latest Marathi News)
कोल्हापूरमध्येही मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rain in Kolhapur) थैमान घातले आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, राधानगरी धरणात (Radhanagari Dam) ८.१९ टीएमसी साठा झाला आहे तर धरण ९८ टक्के भरले आहे. आज धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे.
वालचंदनगर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
ग्रामीण भागातील घरांची पडझड झाली आहे. पंचगंगा (Panchganga) नदीची पाणीपातळी आठ फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पूरबाधित क्षेत्रातीतल कुटुंबांना सर्व साहित्य बांधून स्थलांतरास सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय कोल्हापूर-गगनबावडा-वैभववाडी मार्ग बंद केले आहेत.
पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा मांडवगण ग्रामपंचायत वर धडक मोर्चा