ब्रेकिंग! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये सोन्याची खाण; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

Breaking! Gold mining in 'these' districts of Maharashtra; Chief Minister Eknath Shinde gave the information

एक काळ असा होता की भारतातून सोन्याचा धूर निघत होता असे म्हंटले जात होते. आजही भारतात अनेक ठिकाणी सोन्याच्या खाणी ( Gold Mines in Maharashtra) सापडतात. सध्या महाराष्ट्रात सोन्याच्या खाणी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईमधील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सिंधुदुर्ग व चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याच्या खाणी असल्याची माहिती दिली. महाराष्ट्राच्या भूगर्भात कोळसा, बॉक्साईट, आर्यन या खनिजांसोबत सोनंही असू शकतं, असे खनिकर्म विभागाकडून म्हंटले जात आहे.

गाडी दमान घ्या बारामतीकरांनो! वेग वाढला की 2000 दंड झालाच समजा; प्रशासनाने घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय

केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात महाराष्ट्रात सोन्याचे दोन ब्लॉक असल्याची माहिती दिली गेली आहे. या दृष्टीने राज्यात चाचण्या देखील सुरू झाल्या आहेत. मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये खाण क्षेत्रातील संधी ही गुंतवणूकदारांची परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) उपस्थित होते. यावेळी त्यांनी राज्यातील सोन्याच्या खाणींबाबात उल्लेख केला. विदर्भातील चंद्रपूरमध्ये व कोकणमधील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोन्याचे ब्लॉक आहेत असे ते यावेळी म्हणाले.

अहमदनगरच्या मुलाची कमाल; 10 बाय 10 च्या खोलीत राहून झाला लेफ्टनंट

या पार्श्वभूमीवर हे सोने सध्या महाराष्ट्रात निघाले तर राज्यासाठी ही खूप फायदेशीर गोष्ट असणार आहे. या उपलब्धीचा राज्याला भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. याशिवाय “राज्यात जर खनिजांचा साठा आढळून आला तर देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरु केला जाऊ शकतो”, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

दुग्धव्यवसायाला चालना मिळण्यासाठी दूध संघटनेचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *