Rain Update | मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. महाराष्ट्रात कधी कडाक्याचं ऊन पडत आहे तर कधी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस (Rain) कधी होणार याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे. अद्यापही पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी दिवसेंदिवस लांबणीवर जात आहे. त्यामुळे शेतकरी (Farmer) राजा चिंतेत दिसत आहे. (Latest Marathi News)
Salman Khan । ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे सलमान खानवर गंभीर आरोप; म्हणाली, “मला कुत्र्यासारखं…”
21 जून ही तारीख उजाडली आहे तरीदेखील पाऊस कुठेच पडलेला दिसत नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात धाकधूक सुरु झालीय. दुष्काळ पडतो की काय? अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. या सर्व गोष्टी घडत असतानाच हवामान विभागाकडून दिलासादायक माहिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांना मोठा झटका! गायीच्या दूधदरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पशुखाद्यही महागले
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासांमध्ये मान्सूनच्या सरी मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात बरसण्याची शक्यता आहे. पुणे, महाराष्ट्राचा दक्षिण मध्य भाग, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याकडुन वर्तविला आहे.