यंदा मॉन्सूनचे (Arrival of monsoon) आगमन हे खूप उशिरा झालं आहे. शेतकरी बांधवांना पावसाची खूप आतुरता होती. आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. बारामती, दौंड (Baramati, Daund) परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग चालू आहे.
चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल; म्हणाल्या, “सुप्रियाताई तुम्ही तर सरड्याप्रमाणे रंग…”
भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यात पावसाचे आगमन झालं आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊसआधी उघडझाप करत होता. परंतु काही वेळाने मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे परिसरात कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.
“…म्हणून मी प्रेयसीचे तुकडे केले”, नराधम मनोजने केला धक्कादायक खुलासा
ठिकठिकाणी पावसांच्या सरीच-सरी दिसत आहेत. इतके दिवस गर्मीने हैराण बारामतीकरांना आता गारवा जाणवणार आहे. आता शेतकऱ्यांना पेरणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतीविषयक बरीच कामे मार्गी लागणार आहेत.