16 MLA Disqualification Case । ब्रेकिंग! शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात महत्वाची माहिती आली समोर

Breaking! Important information regarding the disqualification of Shiv Sena MLAs has come to light

16 MLA Disqualification Case । मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गेल्या वर्षी शिवसेना (Shivsena) पक्षात बंड करून भारतीय जनता पक्षासोबत (BJP) युती करून सरकार स्थापन केले. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना खूप मोठा धक्का बसला. एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या त्या 40 बंडखोर आमदारांना शिवसेनेने अपात्रतेची नोटीस बजावली होती. (Latest Marathi News)

“दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपने स्वतःचा पक्ष बांधावा”, मनसेने दिला भाजपला सल्ला

याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना दिला आहे. याप्रकरणी नार्वेकर यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आता ठाकरे गटाकडून जोर धरू लागली आहे. अशातच आता याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे प्रकरण आणखी लांबणीवर पडू शकते.

Buldhana Accident News । ब्रेकिंग! घाटात बस पलटी झाली, शाळकरी मुलांचा मोठा आक्रोश

काल याच पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या 40 आमदारांनी मुदत वाढवून मागितली आहे. अपात्रतेबाबत 10 ऑगस्टपर्यंत निर्णय देण्याची शक्यता होती, परंतु आता आमदारांनी मुदत वाढवून मागितल्याने हे प्रकरण पुन्हा लांबणीवर पडू शकते. अशातच आता राहुल नार्वेकर या आमदारांची मागणी मान्य करणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

ऐकावे ते नवलच! तलाठ्याने घेतली लाच अन् समोर पोलीस दिसताच केलं भयानक कृत्य

Spread the love