सध्या एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) च्या गाडीवर हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. घटना घडली अशी की, पृथ्वी शॉ मित्राच्या गाडीत बसला होता. त्यावेळी काही लोक त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आले मात्र त्याने सेल्फी घेण्यासाठी नकार दिला.
यावेळी सेल्फीसाठी नकार दिल्याने तेथील लोकांनी संतप्त होऊन कारवर हल्ला केला. आता याप्रकरणी ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस करत आहेत.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज पृथ्वी शॉ मागच्या काही दिवसापासून सतत चर्चेत आहे. त्याच्यावर हा हल्ला मुंबई या ठिकाणी करण्यात आला आहे. आता याप्रकरणी काही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाची अजून चौकशी करत आहेत.
धक्कादायक! पगार न झाल्यामुळे एसटी चालकाने आत्महत्या करत संपवले आयुष्य