
ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता व प्रेक्षकांना मारहाण केली याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड वादात सापडले आहेत.
प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिल्याने तरूणाने ग्राइंडर मशिनने चिरला स्वतःचा गळा
काल कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी शिंदे, श्रीकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड हे यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान एका महिलेने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. यामुळे ते पुन्हा एकदा नवीन वादात सापडले आहेत.
उसाच्या ट्रॅालीला धडकून काष्टीच्या तीन तरुणांचा मृत्यू
सध्या त्यांनी एक ट्विट केले आहे. ते ट्विट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४ ,., मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत”.
नागपूर मधील सांस्कृतिक महोत्सवात अल्लू अर्जुन राहणार उपस्थित; नितीन गडकरी यांनी दिली माहिती