‘औरंगजेब हिंदुद्वेष्टा न्हवता’ असे म्हणत, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड ( Jitendra Aavhad) वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर आव्हाड यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत, गृह खात्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. सध्याची राजकीय स्थिती पाहता जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा वाढवण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती गृह मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते (Opposition Leader Ajit Pawar) अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर न्हवते तर स्वराज्य रक्षक होते. असे विधान केले होते. यानंतर भाजप नेते आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत. भाजपकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी “औरंगजेब क्रूर असता तर त्याने विष्णूच मंदिर देखील तोडलं असतं. तो हिंदुद्वेष्टा कधीच न्हवता.” असे वक्तव्य केले होते.
“… तर अजित पवारांना पाकिस्तानमध्ये रवाना करा”; भाजप नेत्यांची मागणी
यावरून जितेंद्र आव्हाड नव्या वादात अडकले आहेत. यावेळी ते असेही म्हणाले आहेत की, “एखाद्याला आपण कमी माहितीच्या आधारावर कोंडीत पकडायला जातो.तेव्हा तो कोंडीत पकडला जात नाही तर इतिहासाची पाने बाहेर पडतात. सगळं शांत असतं तर आम्ही देखील गोळवलकर आणि सावरकर यांची पाने बाहेर काढली असती.”