पदवीधरच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात आता पिंपरी-चिंचवड व कसबा पोटनिवडणुकीची (Pimpri-Chinchwad and Kasba elections) लगबग सुरू आहे. दरम्यान आज काँग्रेसकडून कसबा पेठेतून रवींद्र धंगेकर याना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आज सकाळी कॉंग्रेसचा उमेदवारी अर्ज देखील भरण्यात येणार आहे.
अखेर राखीच्या नवऱ्याने सोडले मौन; म्हणाला “मला सुशांतसिंह राजपूत…”
आज सकाळी कसबा गणपती आणि दगडूशेठ गणपतीचे (Kasba Ganapati and Dagdusheth Ganapati) दर्शन घेऊन अर्ज भरण्यात येणार आहे. दरम्यान, विरोधकांकडून कोणताही उमेदवार असला तरी निवडणूक जिंकणार अशा विश्वास रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी मागच्या दिवसांपूर्वी व्यक्त केला होता.
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा; उमेदवारांचे चित्र होणार स्पष्ट
दरम्यान, आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणुक जाहीर करण्यात आली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात 26 तारखेला कसबा पोटनिवडणुकीचे मतदान पार पडणार आहे.
शरद पवारांनी ‘ते’ विधान करताच सभागृहात पिकला हशा! थेट इंदुरीकर महाराजांनाच केले टार्गेट