येत्या 2024मध्ये लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होत आहेत. त्यामुळे सर्व पक्षांची लगबग सुरु झाली आहे. लोकसभा निवडणूक जरी होणार असल्या तरी त्या आधी राज्यातील विधानसभा निवडणुका होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या पार्शवभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
दररोज बडीशेप खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का? वाचून व्हाल थक्क
यामध्येच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar) यांनी लोकसभा निवडणुकीबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. देशामध्ये येत्या पाच महिन्यात मध्यावधी निवडणुका होणार आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच लोकसभेच्या निवडणुका होतील. असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
मुंबईत सलमान खान बांधणार 19 मजली आलिशान हॉटेल, काय काय असेल यात? वाचा सविस्तर
प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्शवभूमीवरच भाजपने 2 हजाराच्या नोटा बंद केल्या आहेत. निवडून येण्यासाठीचं भाजपची ही खेळी असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल आहे.
काहीतरी शिजतंय? मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन नाना पाटेकर यांनी केली ‘या’ विषयावर चर्चा