Bombay High Court । महाविकास आघाडीने महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने आज या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय देत, अशाप्रकारे बंद घोषीत करणे बेकायदा आहे आणि कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट केले. न्यायालयाने याबाबत तातडीची सुनावणी घेतली आणि बंद पुकारणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले.
Sharad Pawar । झेड प्लस सुरक्षेबाबत शरद पवारांचे सर्वात मोठे वक्तव्य!
या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, न्यायालयाच्या निर्देशाचे पालन राज्य सरकार करेल. शिंदे यांनी असे सांगितले की, या प्रकारच्या बंदामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होतो आणि त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन सुनिश्चित केले जाईल.
महाविकास आघाडीने महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ हा बंद पुकारला होता. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी या बंदसाठी लोकांना आवाहन केले होते. ठाकरे यांनी हा बंद राजकारणासाठी नसून समाजातील विकृतींविरुद्ध असल्याचे सांगितले होते.
Daund News । दौंड तालुक्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; गावात संतापाची लाट
न्यायालयाच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीने आता पुढे काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Politics News । राजकारणातून सर्वात मोठी बातमी! अजितदादा गटाची मोठी खेळी?