Site icon e लोकहित | Marathi News

ब्रेकिंग! नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळची व्यक्ती रुग्णालयात दाखल

Breaking! Narendra Modi's closest person admitted to hospital

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांच्या भावाचा मंगळवारी ( दि.28) मोठा अपघात झाला होता. या अपघातामध्ये प्रल्हाद मोदी ( Pralhad Modi) हे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नरेंद्र मोदींना या घटनेपाठोपाठ आणखी एक धक्का बसला आहे. प्रल्हाद मोदी यांच्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या जवळची आणखी एक व्यक्ती रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.

मोठी बातमी! शेतात काम करत असताना शेतकऱ्यावर अस्वलाने केला हल्ला

मोदी यांची आई हिराबेन मोदी ( Hiraben Modi) यांच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अहमदाबादच्या ( Ahamadabad) यूएन मेहता रुग्णालयात हिराबेन यांच्यावर उपचार सुरू आहेत. यूएन रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनामध्ये मोदींच्या आईला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती देण्यात आली आहे. सोबतच त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगत दिलासा देखील दिला आहे.

गौतमी पाटीलला पोलीस संरक्षण देण्याची मागणी; राज्यात ठीकठिकाणी निदर्शने!

नरेंद्र मोदी यांच्यासाठी कुटुंबातील व्यक्ती म्हणून या दोनच व्यक्ती अतिशय महत्त्वाच्या आहेत. हिराबेन यांचा जून महिन्यात 100 वाढदिवस झाला. हा वाढदिवस मोदींनी अतिशय उत्साहात साजरी केला. यावेळी मोदींनी त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून एक भावनिक पोस्ट लिहिली होती. तसेच हिराबेन यांचे पाय धुवून आशीर्वाद घेण्याचे पुण्य सुद्धा मोदींनी यावेळी घेतले होते.

फडणवीस एवढे का बदलले आहेत? संजय राऊतांनी उपस्थित केला प्रश्न

Spread the love
Exit mobile version