Breaking News | अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरून टाकले होते. या प्रकरणातील आरोपी येरवडा जेलमध्ये होता. मात्र आता या हत्या प्रकरणातील दोषी जितेंद्र शिंदे याने कारागृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरोपी जितेंद्र शिंदे हा याप्रकरणी कारागृहामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता मात्र त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
कारागृहात एखाद्या कैद्याने जीवन संपवणे ही खूप मोठी गोष्ट असून याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे. शिंदे हा कोपर्डी घटनेचा दोषी असून त्याला शिक्षा सुनावली असून तो येरवडा कारागृहामध्ये शिक्षा भोगत होता. मात्र सकाळी त्याने कारागृहामध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.
Tulsi Plant । रविवारच्या दिवशी तुळशीची पाने का तोडू नये? जाणून घ्या यामागचं मोठं कारण
या घटनेबाबत माहिती मिळतात वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाली आहेत. पोलिसांना आरोपीचा मृतदेह पहाटेच्या सुमारास आढळून आला. आता या घटनेबाबत अधिक तपास पोलीस यंत्रणा करत आहे.