Breaking News । राज्यातील कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द; देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा

Devendr Fadanvis

Breaking News । सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील कंत्राटी भरतीचा शासन निर्णय आम्ही रद्द करत आहोत अशी घोषणा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईत पत्रकार परिषद (Press conference) घेत केली आहे. कंत्राटी भरती विरोधात मागच्या काही दिवसापासून राज्यभर आंदोलने झाली होती. त्यामुळे विरोधाकांनी देखील राज्य सरकारला चांगले धारेवर धरले होते. याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय रद्द करत असल्याची माहिती दिली आहे. (Government decision of contract recruitment cancelled)

Manoj Jarange Patil । 24 तारखेच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा… मनोज जरांगे पाटलांचा सरकारला गंभीर इशारा

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. त्याचबरोबर त्यांनी विरोधकांवर देखील चांगलाच निशाणा साधला आहे. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात कंत्राटी भरती संदर्भात मोठ्या प्रमाणात गदारोळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. विशेषतः जे याचे दोषी आहेत, ज्यांनी हे केलंय तेच जास्त आवाज करताहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Baramati News । लोकसभा निवडणुकीआधी बारामतीत मोठ्या राजकीय हालचाली! राज ठाकरे यांच्यासोबत आले अजित पवार?

त्यामुळे आता कंत्राटी भरतीचे दोषी कोण? हे समाजापुढे आले पाहिजे टीका करणाऱ्यांची थोबाड उघडी पडली पाहिजेत. या दृष्टीने काही गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. असं यावेळी ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर कंत्राटी भरतीच्या संदर्भात महाराष्ट्रात पहिला निर्णय मार्च 2003 साली घेण्यात आला होता. त्यावेळी राज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Sharad Pawar । शरद पवारांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार! अत्यंत जवळचा नेता अजित पवारांच्या संपर्कात

Spread the love