
गुजरात | सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातमधील अहमदाबाद शहरात असलेल्या रुग्णालयाच्या बेसमुळे बेसमेंटमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. ही माहिती समजतात अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. त्यानंतर 125 रुग्णांना रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले आहे. माहितीनुसार शहरातील साईबाग परिसरात असलेल्या राजस्थान रुग्णालयाच्या बेसमेंट मध्ये पहाटेच्या सुमारास आग लागली. याबाबत ANI ने वृत्त दिले आहे. (Fire breaks out at a hospital in Ahmedabad’s Sahibaug area.)
अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामामुळे बेसमेंट मध्ये ठेवलेल्या अनेक वस्तूंना आग लागली आणि मोठ्या प्रमाणात दूर झाला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे असून अग्निशमन दलाच्या 20 ते 25 गाड्या घटनास्थळी हजर आहेत.
या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही रुग्णांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. ही आग आटोक्यात आली असून अग्निशमन दलाच्या जवळपास २० ते २५ गाड्या घटनास्थळी दाखल आहेत, माहितीनुसार या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही मात्र रुग्णालयामध्ये धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता त्यामुळे लगेचच खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णांना रुग्णालयातून बाहेर काढून दुसऱ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. आता त्यांच्यावर दुसऱ्या रुग्णालयामध्ये सुरळीत उपचार सुरू आहेत.
Eye Flu । सावधान! राज्यात झपाट्याने पसरतेय डोळ्यांची साथ, अशी घ्या काळजी