ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाल्याची माहिती खोटी असल्याची त्यांच्या पत्नीने सांगितले आहे. याबाबत बोलताना त्यांची पत्नी म्हणाली, “बुधवारी दुपारी ते कोमात गेले त्यामुळे ते व्हेंटिलेटरवर आहेत. पुढे काय करायचं हे सकाळी डॉक्टर ठरवतील. त्यांची प्रकृती सुधारतेय का यावरून डॉक्टर पुढील निर्णय घेतील”, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासन देखील शांत
दरम्यान, त्यांच्या निधनाच्या बातमीने समाज माध्यमांवर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केला. पण सद्या तरी त्यांच्या निधनाची बातमी अफवाच ठरली आहे. दरम्यान, मागच्या काही दिवसांपासुन विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास होता. त्यातमधेच त्यांना जलोदर झाल्यामुळे त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
पशुसेवा कृतज्ञता पुरस्कार सोहळा संपन्न; औरंगाबाद सिटी कॅनन क्लब चे उद्घाटन
दरम्यान, विक्रम गोखले यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटक या सर्व व्यासपीठावर काम केले होते. त्यांनी अनेक महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. चित्रपटांबरोबरच त्यांनी नाटकांमध्येही अत्यंत नावाजलेले कलाकार म्हणून ओळखले जाते. मराठी चित्रपटाबरोबर त्यांनी अनेक हिंदी चित्रपट देखील ओळख निर्माण केली आहे.
वाढत्या थंडीचा दुभत्या जनावरांवर परिणाम, दूध उत्पादनात घट; वाचा सविस्तर